Satara : सातारा जिल्ह्यात विसर्जनाची जय्यत तयारी; विसर्जन मिरवणुकीवर 5 हजार पोलिसांचा असणार वॉच

Satara : सातारा जिल्ह्यात विसर्जनाची जय्यत तयारी; विसर्जन मिरवणुकीवर 5 हजार पोलिसांचा असणार वॉच

दहा दिवस बाप्पाची सेवा केल्यानंतर आज थाटामाटात बाप्पाच्या मुर्तीचे विसर्जन केले जाणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

इम्तियाज मुजावर, सातारा

दहा दिवस बाप्पाची सेवा केल्यानंतर आज थाटामाटात बाप्पाच्या मुर्तीचे विसर्जन केले जाणार आहे. दहा दिवस लाडक्या गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर घरगुती गणपतींसह सार्वजनिक मंडळांच्या गणपतींना आज निरोप देण्यात येणार आहे.

विसर्जन मिरवणुकांची लगबग सुरू झालेली पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात गणपती विसर्जनासाठी पोलीस दल अलर्ट झाल्याचे पाहायला मिळत आहे.

सातारा शहरातील मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी तब्बल 60 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार असून सीआरपीएफ, आरसीपी व स्ट्रायकिंगच्या 28 तुकड्या तैनात करण्यात आल्या असल्याची माहिती मिळत आहे.

यासोबतच विविध शहरातील विसर्जन मिरवणुकींवर तब्बल ५ हजारहून अधिक पोलिस अधिकारी, कर्मचारी व होमगार्ड यांचा वॉच राहणार असून सातारा पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com